Tumche-Aamche_Superhero- Vikram_Gaikwad
Click Image for Gallery
सौंदर्य विचारांत
असतं. मनाच्या गाभ्यात असतं.
आपलं रूप
आपण ठरवू शकत नाही.
रूप आपण
जन्माला येताना घेऊन येतो,
पण विचार
करणं आपल्या हातात असतं.
सात्विक विचार
चेहर्यावर उमटतात आणि
सौंदर्य प्राप्त करून देतात.
सुंदर दिसण्यासाठी
मनाचा तळ सुंदर विचारांनी
भरलेला हवा,
तरच त्यांचं
प्रतिबिंब चेहर्यावर उमटतं.
सौंदर्य केवळ
कपड्यांतून नाही तर सुसंस्कृतता
आणि अदब यामुळे खुलतं.
मेकअप फक्त
मुळातलं सौंदर्य खुलवतो, निर्माण नाही
करू शकत.
कुणाला सौंदर्य
बहाल करणं हा मुळी
मेकअपचा हेतूच नाही.
